जेलमध्ये नेमकं घडलं काय ?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

जेलमध्ये नेमकं घडलं काय ?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. गुन्हेगारी कारवायांमुळे मकोका कायद्याखाली अटकेत असलेले हे दोघे बीडच्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. 

हेही वाचा:अंडा सेलमध्ये प्रशांत कोरटकरवर 10 सीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

या तुरुंगात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपीही कैद आहेत. अक्षय आठवले आणि महादेव गीते, हे दोन आरोपी शेजारच्या बॅरेकमध्ये होते. आधी किरकोळ वाद झाला आणि त्याचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले. अशी माहिती समोर आली होती.  त्यानंतर आठवले आणि गीते या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर हल्ला चढवला असल्याचंही बोलल्या जात होत. त्यानंतर आता या जेलमधल्या मारहाणीच सत्य समोर आलं आहे. 

नेमकं काय घडलं? 
दि.३१ मार्च २०२५ रोजी न्यायाधीन बंदी नामे सुदिप रावसाहेब सोनवणे व न्यायाधीन बंदी राजेश अशोक वाघमोडे हे दोघे आपआपले सर्कल समोर सकाळी ०९.१५ ते ०९.३० च्या  दरम्यान त्यांना लागु असलेल्या सुविधेनुसार नातेवाईक यांना दुरध्वनी करण्यासाठी आले असता एकमेकांकडे पाहुन त्यादोघांमध्ये शाब्दीक चकमक होऊन त्यांच्यामध्ये झटापटी होऊ लागली. 

 वेळीच कर्तव्यावरील कारागृह कर्मचारी झटपाटी सोडवत असताना इतर बंदी कारागृहाच्या सर्कल मध्ये धावत आले व गोंधळ व शिवीगाळ करु लागले त्यावेळी कर्तव्यावरील कर्मचारी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणुन त्यांना वेगवेगळे केले व आपआपले यार्डमधील बरॅकमध्ये बंदीस्त करण्यात आले. सदर घटनेमधील गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करणेकरीता शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे तक्रार दाखल करीत आहोत. व सध्यस्थितीत कारागृहात शांतता आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number