Weather Update: 31 मेपासून संपूर्ण कोकणात पाऊस सक्रीय; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात काय स्थिती?

हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल होणार असून महाराष्ट्रतही याचे पडसाद पाहायला मिळणार आहेत.

Weather Update: 31 मेपासून संपूर्ण कोकणात पाऊस सक्रीय; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात काय स्थिती?

राज्यात उकाड्याने हैराण नागरिक मान्सून राज्यात कधी दाखल होतो याची वाट पाहत आहे. हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल होणार असून महाराष्ट्रतही याचे पडसाद पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  दरम्यान आज मुंबईसह कोकणात आणि ठाणे, पालघरमध्ये कमाल तापमान 30-37 अंश सेल्सिअस इतके राहणार असून कोकणात हलक्या पावसाची शक्यता वर्तावण्यात आली आहे. 

हेही वाचा- Low Rainfall Impact on Economy : दुष्काळात तेरावा महिना! आखाती युद्धाचा फटका अन् कमी पावसाच्या अंदाजानेही दिली चिंता; महागाईचा दुहेरी हल्ला!

तर दुसरीकडे उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान 33-38 अंशांपर्यंत असून आज वादळी पावसाची तीव्र शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीह नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच विदर्भात गेल्या आठवड्याभरापासून तापमान सातत्याने 45 ते 46 अंश सेल्सिअसच्या पार गेल्याचे पाहायला मिळत आहे.

तरी सुद्धा अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पुढील 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट असून गारपिटीची शक्यता आहे. मराठवाड्यात ताशी 40-50 किमी वेगाच्या वाऱ्यांसह वादळी पावसाचं संकट घोंघावत आहे. काही जिल्ह्यात विजांसह गडगडाटी पावसाची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number