उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ या ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. याचपार्श्वभूमिवर भारत आणि महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील वातावरण गारठा जाणवायला मिळतो आहे. 22 ते 25 डिसेंबर दरम्यान राज्यातील काही ठिकाणी दाट धुकं पडू शकतं.
हेही वाचा- Dadar : दादर स्टेशन परिसरात मनोरुग्णाचा धुमाकूळ; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
अशातच मुंबई व उपनगरांमध्ये किमान तापमान 18 ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत असून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या तापमानात काही अंशानी वाढ होऊ शकते. तर पुण्यात किमान तापमान 10 अंशांपर्यंत असून पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये गारवा कमी होईल. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगावमध्ये किमान तापमान 9 अंश सेल्सिअस राहणार असून धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 9 ते 10 अंशाच्या दरम्यान असेल.
हेही वाचा- EPFO New Rule: कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! EPFOकडून मोठ्या घोषणा, आता सुट्ट्या…
तसेच भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 आणि 20 डिसेंबर रोजी पंजाबमध्ये आणि 22, 24 आणि 25 डिसेंबर दरम्यान हरियाणा आणि चंदीगडमध्ये दाट धुके आणि कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. त्याचसोबत 19 ते 21 डिसेंबर दरम्यान उत्तर प्रदेशात काही ठिकाणी पहाटे दाट धुके पडू शकतात. 21 आणि 22 डिसेंबरमध्ये बिहारमध्ये तर 19 आणि 20 डिसेंबरमध्ये झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दाट धुकं अनुभवायला मिळू शकतात. उत्तरेकडील भागात गारठा वाढत चालला असून उत्तरेकडील गारठ्याचा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत थंडीमध्ये झपाट्याने वाढ झाली असून नागरिकांना पहाटे आणि रात्री तीव्र गारठ्याचा सामना करावा लागत आहे. मात्र डिसेंबरच्या अखेरपर्यंत हवामान थंड राहील, तापमानाचा पारा कमीच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.