…म्हणून ‘या’ पत्रकाराला वाळू माफियांनी भरदिवसा अंगावर ट्रक घालून चिरडलं
वृत्तसंस्था, मध्य प्रदेश मध्य प्रदेशातील भिंद जिल्ह्यात एका पत्रकाराची अंगावर ट्रक घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संदीप शर्मा असे या पत्रकाराचे नाव असून ते न्यूज वर्ल्ड चॅनेल या वृत्तवाहिनीसाठी स्ट्रिंजर म्हणून काम करत होते. अपघातानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संदीप शर्मा यांनी दोन पोलीस अधिका-यांचे स्टिंग […]
मध्य प्रदेशातील भिंद जिल्ह्यात एका पत्रकाराची अंगावर ट्रक घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संदीप शर्मा असे या पत्रकाराचे नाव असून ते न्यूज वर्ल्ड चॅनेल या वृत्तवाहिनीसाठी स्ट्रिंजर म्हणून काम करत होते.
अपघातानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संदीप शर्मा यांनी दोन पोलीस अधिका-यांचे स्टिंग ऑपरेशन केलं होतं.
आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांनी पोलीस सुरक्षेची मागणीही केली होती.