‘ही घटनेची पायमल्ली आहे’ – राधाकृष्ण विखेपाटील

वृत्तसंस्था, मुंबई विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आलाय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा ठराव मांडलाय. विधानसभा अध्यक्ष सदन चालवताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणी सोमवारी विरोधकांनी मंत्रालयात पत्रकार परिषदही घेतली. ‘गेले दोन दिवस सरकारी पक्षाकडून सभागृहाचे कामकाज होऊ दिले जात नाही. सरकार विरोधी पक्षाच्या […]

‘ही घटनेची पायमल्ली आहे’ – राधाकृष्ण विखेपाटील

वृत्तसंस्था, मुंबई

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आलाय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा ठराव मांडलाय. विधानसभा अध्यक्ष सदन चालवताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणी सोमवारी विरोधकांनी मंत्रालयात पत्रकार परिषदही घेतली.

‘गेले दोन दिवस सरकारी पक्षाकडून सभागृहाचे कामकाज होऊ दिले जात नाही. सरकार विरोधी पक्षाच्या प्रश्नांना नीट उत्तर देत नाही. राज्यपाल अभिभाषणावर उत्तरही न देता विधानसभा अध्यक्षांनी मतदान घेऊन टाकलं त्यामुळे ही घटनेची पायमल्ली आहे. सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही. अशी सरकारची भूमिका दिसते. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number