Pandharpur: भाविकांसाठी मोठी बातमी! ‘या’ 10 दिवसांत विठ्ठलाचं VIP दर्शन आणि पाद्यपूजा बंद राहणार

डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच पंढरपुरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी पोहोचत असून येत्या नाताळ सुट्ट्यांमुळे ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता दिसत आहे.<br/>

Pandharpur: भाविकांसाठी मोठी बातमी! ‘या’ 10 दिवसांत विठ्ठलाचं VIP दर्शन आणि पाद्यपूजा बंद राहणार

Pandharpur: डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून नववर्षाच्या सुरुवातीपर्यंत सुट्ट्यांचा कालावधी सुरु होताच राज्यातील प्रमुख देवस्थानांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळते. शिर्डी, तुळजापूर, अक्कलकोट, कोल्हापूरसोबतच पंढरपूरमध्येही भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच पंढरपुरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी पोहोचत असून येत्या नाताळ सुट्ट्यांमुळे ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता दिसत आहे.

हेही वाचा –  Maharashtra Farmers Loan Scheme: न्यायालयाच्या आदेशानंतरही सहा लाखांपेक्षा शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित; सरकारची धक्कादायक कबुली

या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिर समितीने गर्दीचे व्यवस्थापन सुकर करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत व्हीआयपी दर्शन, टोकन दर्शन आणि ऑनलाइन दर्शन सेवा पूर्णपणे स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कालावधीत सर्व भक्तांना केवळ सामान्य दर्शनरांगेतूनच विठ्ठल-माउलीचे दर्शन घेता येणार आहे.

हेही वाचा – Ambadas Danve On Relief Fund: अतिवृष्टी मदत निधीवरून वाद वाढला; दानवे यांच्या आरोपांचे CMO कार्यालयाकडून उत्तर

पाद्यपूजा दहा दिवसांसाठी बंद

दरम्यान, भाविकांना कमी प्रतीक्षा वेळेत दर्शन मिळावे यासाठी समितीने आणखी एक पाऊल उचलत पाद्यपूजाही पुढील दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. वाढत्या गर्दीतही जास्तीत जास्त भक्तांना सुरळीत आणि तत्पर दर्शन मिळावे, याच उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होणाऱ्या भाविकांसाठी हे निर्णय दिलासादायक ठरणार असून, सुट्ट्यांच्या काळातील व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number