गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजपची सत्ता, मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी विराजमान

वृत्तसंस्था, नवी दिल्ली गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजप सरकार स्थापन झाले आहे. विजय रूपाणींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय. गांधीनगरमधील सचिवालयाच्या मैदानात हा शपथविधी पार पडला आहे. रुपाणी यांच्यासोबत नितीन पटेल यांनी ही शपथ घेतली आहे. ते गेल्या सरकारप्रमाणेच या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, 18 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय […]

गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजपची सत्ता, मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी विराजमान

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजप सरकार स्थापन झाले आहे. विजय रूपाणींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय. गांधीनगरमधील सचिवालयाच्या मैदानात हा शपथविधी पार पडला आहे. रुपाणी यांच्यासोबत नितीन पटेल यांनी ही शपथ घेतली आहे. ते गेल्या सरकारप्रमाणेच या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत.

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, 18 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. शपथविधी सुरु होण्याआधी रुपाणींनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. रुपाणींच्या ऐवजी दुसऱ्या कुणाला संधी द्यावी का, यावर विचार सुरू होता. पण, शेवटी मोदी आणि शहांनी रुपाणींच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं होतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number