Pune Vidyanand Bapat Attack Case: "विद्यानंद बापटांचा लोकमान्य टिळकांच्या विचारांना विरोध" बापट यांना मारहाण करणाऱ्या आरोपीची पहिली प्रतिक्रिया समोर

Pune Vidyanand Bapat Attack Case: पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर सकाळी एका तरुणाने हात उचलत मारहाण केली.

Pune Vidyanand Bapat Attack Case: &quotविद्यानंद बापटांचा लोकमान्य टिळकांच्या विचारांना विरोध&quot बापट यांना मारहाण करणाऱ्या आरोपीची पहिली प्रतिक्रिया समोर

Pune Vidyanand Bapat Attack Case: पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर सकाळी एका तरुणाने हात उचलत मारहाण केली. गणेशोत्सवादरम्यान DJ आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकाच्या आवाजावर टीका करत विद्यानंद बापट हे एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना हा प्रकार घडला. आरोपीची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आले आहे. 

नुकताच आरोपीने समाज माध्यमांवर केलेल्या कृत्याचा जबाब हा व्हिडिओ स्वरूपात शेअर केला. त्याचे नाव संतोष चव्हाण असून तो कोथरूडमधील राऊतवाडी परिसरातील स्थायिक आहे.तो स्थानिक बांधकाम अधिकाऱ्याकडे नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असून स्वतःला गणेशप्रेमी म्हणवतो. यामुळे खास गणेशोत्सवातच ही DJ वर बंदी का ? बापटांना फक्त हिंदू सणच दिसतात असा थेट सवाल त्याने या व्हिडिओ मार्फत केला.

 

हेही वाचा – Devendra Fadnavis on Vidyanand Bapat : “प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार” बापट यांना मारहाण; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

 

तसेच पुणे आणि सोलापूर गणेश मंडळांची तुलना करणे कसे चुकीचे आहे, याबाबत माहिती दिली. आवाजाची मर्यादा पाळली गेली तर ध्वनीप्रदूषण कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. तसेच या DJ- साऊंड बरोबरच लाईटवाले, जनरेटर, ट्रॅक्टर-ट्रॉली, हमाल, साऊंड तंत्रज्ञ, सजावट कामगारांच्या पोटावर लाथ मारली जाईल, असे स्पष्ट केले. 

विद्यानंद बापट हे लोकमान्य टिळकांच्या विचारांना विरोध करत असून त्यांना इतर प्रदूषण दिसत नाही असा टोला लगावला.साऊंड बंद हा एकच पर्याय नसून सर्व मंडळ, प्रशासाने एकत्र बसून यावर तोडगा काढायला हवा आणि मंडळांनी त्याचे पालन करायला हवे, नवीन नियम तयार करायला हवे. असे शेवटी म्हटले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number