दादा खिंडकरकडून मारहाण झालेल्या ओमकार सातपुतेचा व्हिडीओ समोर; कोण आहे ओमकार सातपुते?

बीडमधील दहशत दिवसेंदिस वाढताना पाहायला मिळत आहेत.

दादा खिंडकरकडून मारहाण झालेल्या ओमकार सातपुतेचा व्हिडीओ समोर; कोण आहे ओमकार सातपुते?

बीड : बीडमधील दहशत दिवसेंदिस वाढताना पाहायला मिळत आहेत. यातच आता बीडमधल्या मारहाणीचा आणखी एक व्हिडीओ समोर येत आहे. ओमकार सातपुते एका मुलाला मारहाण करत असल्याचं समोर आलं आहे. नुकतच दादा खिंडकर याच्याकडून सातपुतेला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

बीडमधील मारहाणीचे व्हिडीओ  दिवसेंदिवस समोर येतं आहेत. आता दादा खिंडकरकडून मारहाण झालेल्या सातपुतेकडून दुसऱ्या तरुणाला मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर येत आहे. ओमकार सातपुते हा ठाकरे गटाच्या जिल्हा अध्यक्षांचा चुलत भाऊ आहे. ओमकार सातपुतेकडून एका मुलाला मारहाण करताना दिसत आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्येही अमानुष पद्धतीने मारहाण केली जात आहे. बुधवारी ओमकार सातपुते याला दादा खिंडकरने मारहाण केलेला व्हिडिओ समोर आला होता. 

हेही वाचा : दादा खिंडकर बीडच्या पोलिसांना शरण

ओमकार सातपुते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांचा चुलत भाऊ असल्याचे समोर आलं आहे. आता ओमकार सातपुते याच्याकडून एका तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून कारवाई केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

दादा खिंडकर पोलिसांना शरण 
संतोष देशमुख यांचे साडु दादा खिंडकर याचा ओमकार सातपुतेला मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला. हा मारहाणीचा व्हिडीओ जुना असल्याचे दादा खिंडकरने सांगितले होते आणि प्रकरण मिटल्याचं त्याच्याकडून सांगितलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.  गुरूवारी सकाळी दादा खिंडकर पोलिसांंना शरण आला आहे. दादा खिंडककरसह चार ते पाच जण तरूणाला बेदम मारहाण करत होते. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक पोलिस कर्मचारी असल्याचा संशय आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number