रुक्मिणी मातेच्या मुर्ती विक्रीसाठी विक्रेते सज्ज

आषाढी यात्रा काळात सर्वांत जास्त मागणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुर्तींना असते. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुर्तींची खरेदी करतात. त्यामुळे मोठ्या संख्येने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती बनवल्या जातात. त्यासाठी कर्नाटकातील शाळीग्राम महाराष्ट्रातील काळा पाषाण आणि राजस्थान मधील काळा मार्बल दगडाचा वापर केला जातो. तीन फुटी, दीड […]

रुक्मिणी मातेच्या मुर्ती विक्रीसाठी विक्रेते सज्ज

आषाढी यात्रा काळात सर्वांत जास्त मागणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुर्तींना असते. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुर्तींची खरेदी करतात. त्यामुळे मोठ्या संख्येने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती बनवल्या जातात. त्यासाठी कर्नाटकातील शाळीग्राम महाराष्ट्रातील काळा पाषाण आणि राजस्थान मधील काळा मार्बल दगडाचा वापर केला जातो.

तीन फुटी, दीड फुटी अलंकारी आणि नऊ इंचाच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बनवल्या जातात. एक मूर्ती बनवायला दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत असल्याने व्यावसायिक तीन चार महिने आधीच कामाला सुरुवात करतात. दहा हजारांपासून सव्वा लाख रुपये पर्यंत खरेदी विक्री होते. त्यामुळे यात्रा काळात चांगली आर्थिक उलाढाल श्री विठ्ठल रुक्मिणी आणि संतांच्या मुर्ती खरेदी विक्रीतून होते. पंढरपूरात मूर्ती बनवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून व्यावसायिक विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मूर्ती विकण्यासाठी तयार झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number