मुंबईमध्ये वाहन पार्किंगची नेहमी समस्या उद्भवते. मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. तसेच वाहन पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे अनेक प्रवासी रस्त्यावर नो पार्किंगमध्ये वाहने पार्क करतात. नो पार्किंगमध्ये वाहने पार्क केल्यामुळे पोलीस ते वाहने उचलून घेऊन जातात. दरम्यान, यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी वाहनधारकांना गोड बातमी दिली आहे. संजय पांडे यांनी ट्विट करत सांगितले आहे की, ‘मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहने उचलण्यात येणार नाही.’
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट केले की, ‘प्रिय मुंबईकरांनो, आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. सर्वात आधी आम्ही वाहने उचलून नेणे थांबवित आहोत. सर्वांनी जर नियमांचे पालन केले तर प्रायोगिक तत्वावरील हा प्रयोग नियमित करण्यात येईल. तुम्हाला काय वाटते ते मला नक्की सांगा.’
प्रिय मुंबईकरांनो,
आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. सर्वांत आधी आम्ही वाहने उचलून नेणे थांबवित आहोत. आपण सर्वांनी जर नियमांचे पालन केले तर प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग नियमित करण्यात येईल. तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की सांगा! — Commissioner of Police, Greater Mumbai (@CPMumbaiPolice) March 5, 2022
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केलेल्या ट्विटनुसार, वाहतूक पोलिसांकडून वाहने उचलणे थांबवले असून वाहनधारकांनी नियम पाळले नाहीत तर ‘नो पार्किंग’वरील पार्क केलेले वाहने उचलणे पुन्हा होऊ शकत.
काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.