नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांचे दर २५ टक्क्यांनी वाढले आहेत. लांबलेला उन्हाळा आणि पाण्याची कमतरता यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. आवक कमी आणि मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर वाढले असून यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, फरसबी, वाटाणा, मिरची आणि कोथिंबीरचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेळे पहायला मिळत आहेत. भाजीपाल्याचे दर नियंत्रणात येण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी व्यक्त केले आहे.
भाजीपाला दर प्रतिकिलो
कारली – ३७
सिमला – ३०
काकडी- २२
वांगी- २८
दुधी – १७
फरसबी – ५५
वालवड- २६
शिराळी – २५
शेवगा – ४३
गवार – ४०
गाजर – २८
कोबी- ९
फ्लॉवर- १०
वाटाणा – ६०
तोंडली – २५
भेंडी- २४
मिरची – ४८
टोमॅटो – ३६
प्रती जुडी
पालक – १२
कोथंबीर – २२
शेपू – २०
मेथी – १८
कांदापात – १४