राज्यात आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. राज्यात ठिकठिकाणी मुलांच्या लसीकरणासाठी लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. नाशिकमध्येही सोमवारपासून मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे.
नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. नाशिक शहरात मुलांच्या लसीकरणासाठी सहा ठिकाणी केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच लसीकरणाच्या पहिल्या दिवशी अनेक मुलांनी लस घेण्यास सहकार्य केले.
यावेळी ‘देशातील काही राज्यांमध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यांनी लॉकडाउन संदर्भात निर्णय घ्यावा असे सूचक वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केले आहे. तसेच केंद्राने सर्व राज्यांना लस उपलब्ध करून दिली आहे, मात्र राज्यात कोरोनाचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचा आकडा कमी असून तो वाढवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया भारती पवार यांनी दिली आहे. तसेच मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले आहेत.