वृत्तसंस्था, नवी दिल्ली
उत्तरप्रदेशात योगीराज सुरू झाल्यामुळे महिला सुरक्षित झाल्याचा दावा भाजप नेते करत आहेत.
मात्र, दुसरीकडे उत्तरप्रदेशातील आमदारचं महिलांवर अरेरावी करताना दिसत आहेत.
दारूविक्री थांबविण्यासाठी गावकरी आंदोलन करत असतानाच तणाव निर्माण झाला. पोलिसांनी आंदोलकांना आवरण्यासाठी लाठीमार केला. या घटनेची माहिती समजताच स्थानिक आमदार
डॉ. राधा मोहनदास अग्रवाल याठिकाणी दाखल झाले.
यावेळी त्यांनी येथे बंदोबस्तावर तैनात असलेल्या आयपीएस अधिकारी चारू निगम यांना असे काही झापले की चारू निगम यांना आपले अश्रू अनावर झाले.