या बैठकीत, ‘भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावरचा आरोपांची तपासणी करून सरकार १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले आहे’, अशी माहिती पत्रकार परिषदेतून अनुराग ठाकूर यांनी दिली. ‘महिलेच्या अध्यक्षतेखाली कुस्ती महासंघांतर्गत तक्रार समिती स्थापन करण्यात यावी’, असेही अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.
‘आमचे आंदोलन १५ जूनपर्यंत स्थगित करण्यास सांगितले आहे’, अशी माहिती साक्षी मलिक यांनी बैठकीनंतर दिली आहे. तर दुसरीकडे, ‘१५ जूनपर्यंत आंदोलन स्थगित केले आहे पण आंदोलन संपलेले नाही’, असे वक्तव्य कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी केले आहे.
१५ जूनपर्यंत बृजभूषण प्रकरणी आरोपांवर चौकशी पूर्ण करून आरोपपत्र दाखल करावे.
३० जूनपर्यंत कुस्ती महासंघाच्या निवडणूका घेण्यात याव्यात.
कुस्ती महासंघाच्या निवडणुकीबाबत खेळाडूंचे मत घ्यावे.
कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण आणि त्यांचे लोक निवडून येऊ नयेत.
महिलेच्या अध्यक्षतेखाली कुस्ती महासंघा अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्यात यावी.
कुस्ती महासंघाच्या निवडणुकीपर्यंत आयओएच्या अनौपचारिक समितीवर २ प्रशिक्षकांची नावे प्रस्तावित
महिला खेळाडूंना गरज पडेल तेव्हा सुरक्षा देण्यात यावी.
खेळाडू, कोच, आखाडे, अकादमी यांच्याविरोधातील गुन्हे मागे घ्यावेत.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.