नागपूरच्या शिक्षण विभागातील घोटाळा प्रकरणी दोन दोषींना अटक

नागपूरच्या शिक्षण विभागातील घोटाळा झाल्याचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणी दोन दोषींना अटक करत पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे.

नागपूरच्या शिक्षण विभागातील घोटाळा प्रकरणी दोन दोषींना अटक

नागपूर : नागपूरच्या शिक्षण विभागातील घोटाळा झाल्याचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणी दोन दोषींना अटक करत पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने शिक्षण विभागातील घोटाळा बाहेर काढला होता. 

शिक्षक नसतानाही शालार्थ आयडी देण्याचा प्रताप शिक्षण उपसंचालकांनी केला. इतकेच नव्हे तर त्या शिक्षकाला मुख्याध्यापकपदी पदोन्नतीही दिली. आयडी शिक्षकांना वेतन मिळविण्यासाठी आवश्यक असते आणि ती देण्याचा अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालकांना असतो. त्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

हेही वाचा : अमित शाह आज रायगड दौऱ्यावर; शिवपुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर अभिवादन करणार

नियमबाह्य शालार्थ आयडी काढून वेतन दिल्याप्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड सह मुख्याध्यापक पराग पुडके याला नागपूरमधील सदर पोलिसांनी गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातून अटक केली आहे. मुख्याध्यापक पराग पुडके याने एका खासगी शाळेत शिक्षक असल्याबाबत बनावट कागदपत्र तयार केले. या कागदपत्रांच्या आधारे त्याला उपसंचालक कार्यालयाकडून शालार्थ आयडी देण्यात आली. त्यानंतर त्याची भंडारा जिल्ह्यातील एका शाळेत बदली करण्यात आली.

नागपूरातील शिक्षण विभागाला दणका देण्याचे काम जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने केले आहे. नागपुरातील शिक्षण विभागाचा घोटाळा जय महाराष्ट्रने बाहेर काढला आणि दोन दोषींना अटक करत कारवाईला सुरुवात केली. शिक्षक नसून पराग पुडके याला शालेय आयडी देण्याचा प्रताप शिक्षण उपसंचालकांनी केला. इतकेच नाही तर पुडकेची मुख्याध्यापकपदी पदोन्नतीही केली. शालार्थ आयडी शिक्षकांना वेतन मिळविण्यासाठी आवश्यक असते आणि ती देण्याचा अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालकांना असतो. याच आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मुख्यधापक पराग पुडके याने एका खासगी शाळेत शिक्षक असल्याबाबत बनावट कागदपत्र तयार केले. या कागदपत्रांच्या आधारे त्याला उपसंचालक कार्यालयाकडून शालार्थ आयडी देण्यात आली. त्यानंतर त्याची भंडारा जिल्ह्यातील एका शाळेत बदली करण्यात आली. संबंधित शिक्षकाने शासनाकडून वेतनाचीही उचल केली. या प्रकरणी नागपुरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आणि शिक्षण विभागाकडून या प्रकरणातील तांत्रिक बाजू समजून घेतल्या. चौकशी दरम्यान आरोप सिद्ध झाले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number