दहिसर एसबीआय बॅंक गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटक

मुंबईमधील दहिसर पश्चिम येथील एसबीआय बॅंकेच्या शाखेत लुटरूंकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दहिसर पश्चिमयेथील गुरुकुल बिल्डिंग जीएस रोड येथे अलेलेल्या एसबीआय बॅंकेवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला. या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. धर्मेंद्र यादव आणि विकास यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दहिसर […]

दहिसर एसबीआय बॅंक गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटक

मुंबईमधील दहिसर पश्चिम येथील एसबीआय बॅंकेच्या शाखेत लुटरूंकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दहिसर पश्चिमयेथील गुरुकुल बिल्डिंग जीएस रोड येथे अलेलेल्या एसबीआय बॅंकेवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला. या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. धर्मेंद्र यादव आणि विकास यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दहिसर पश्चिम येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बॅंकेमध्ये सशस्त्र दरोडा पडलेल्या बँकेच्या शाखेला भेट दिली. यावेळी परिमंडळ ११चे पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर, आमदार मनीषा चौधरी, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, नगरसेवक हरीश छेडा, शाखा व्यवस्थापक आदी उपस्थित होते.

दुपारी चारच्या सुमारास दहिसरच्या गुरुकुल इमारतीतील एसबीआय बॅंकेत ही घटना घडताक्षणी एमएचबी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू असून या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एक जण गंभीर जखमी असून त्याला जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number