Bhiwandi Lawyer Death : धावत्या दुचाकीवर आला हृदयविकाराचा झटका; विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा दुर्दैवी मृत्यू

रोजच्याप्रमाणे सकाळी नेहमीच्या कामासाठी बाहेर पडलेल्या एका तरुण वकिलाचा आणि सामाजिक कार्यकर्त्याचा धावत्या दुचाकीवरून जात असताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

Bhiwandi Lawyer Death : धावत्या दुचाकीवर आला हृदयविकाराचा झटका; विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा दुर्दैवी मृत्यू

Bhiwandi lawyer Death:  भिवंडी शहरात एक अत्यंत सुन्न करणारी आणि धक्कादायक घटना घडली आहे. रोजच्याप्रमाणे सकाळी नेहमीच्या कामासाठी बाहेर पडलेल्या एका तरुण वकिलाचा आणि सामाजिक कार्यकर्त्याचा धावत्या दुचाकीवरून जात असताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ॲड. नितीन श्रीपत तांबे (वय 42) असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते बहुजन विद्यार्थी संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ही संपूर्ण धक्कादायक घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पेपर खरेदी करून परतताना घडला प्रसंग
भिवंडी महानगरपालिकेचे कामगार नेते श्रीपत तांबे यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते. ॲड. नितीन तांबे हे सकाळी वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी शहरातील कासार आळी परिसरात गेले होते. पेपर विकत घेतल्यानंतर ते आपल्या स्कुटरवरून घराच्या दिशेने परतत असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना झाल्या. हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की, चालू गाडीवरच त्यांचे नियंत्रण सुटले आणि ते बेशुद्ध होऊन रस्त्यावर खाली कोसळले.

स्थानिकांची रुग्णालयात धाव, पण उपचारांपूर्वीच प्राण ज्योत मालवली
हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या नितीन यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने उपचारासाठी जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

हेही वाचा – FDA Action On Cipla Pharma : साठवणुकीतील त्रुटी आणि बेकायदेशीर जाहिरातींमुळे Cipla Pharma चा औषध विक्रीचा परवाना रद्द; FDA चा दणका

भिवंडी शहर आणि महापालिका वर्तुळात शोककळा
ॲड. नितीन तांबे हे भिवंडीतील विविध सामाजिक आणि विद्यार्थी चळवळींमध्ये सातत्याने सक्रिय असायचे. त्यांच्या अशा अचानक आणि अकल्पित जाण्याने भिवंडी शहर, बहुजन चळवळ आणि पालिका कामगार वर्तुळात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत मनमिळाऊ आणि अभ्यासू नेतृत्व गमावल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number