Shahapur Road Accident: देवाचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; जोगेश्वरीतील 4 भाविकांचा मृत्यू, 7 जखमी

रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभ्या असलेल्या एका जुन्या जळालेल्या ट्रकला मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने अतिवेगात जोरदार धडक दिली.

Shahapur Road Accident: देवाचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; जोगेश्वरीतील 4 भाविकांचा मृत्यू, 7 जखमी

Shahapur Road Accident: मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शहापूर तालुक्यातील अटगावच्या हद्दीत एक अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणारा अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभ्या असलेल्या एका जुन्या जळालेल्या ट्रकला मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने अतिवेगात जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत एका लहान बालकासह तब्बल 4 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी मुंबईतील जोगेश्वरी येथील रहिवासी असून, ते त्र्यंबकेश्वर येथे देवाचे दर्शन घेऊन आपल्या घरी परतत असताना हा दुर्दैवी प्रसंग ओढवला.

वाहनावरील ताबा सुटल्याने घडला अपघात 

जोगेश्वरीतील कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक नाशिकहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. अटगाव परिसरात आले असता, महामार्गावर दीर्घकाळापासून थांबलेल्या एका जळालेल्या ट्रकचा चालकाला अंदाज आला नाही अथवा वेगावरील ताबा सुटल्याने कार थेट या ट्रकावर जाऊन धडकली. अपघाताचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरातील नागरिक तात्काळ मदतीसाठी धावले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि शहापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

हेही वाचा – Aditya Thackeray: 'मी दिशा सालियन यांना कधीही…' आदित्य ठाकरेंनी 6 वर्षांच्या आरोपांवर अखेर मांडली भूमिका

जोगेश्वरी परिसरात शोककळा; जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

या दुर्घटनेत जखमी झालेल्या 7 जणांना तातडीने शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. देवाचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने अचानक झडप घातल्यामुळे जोगेश्वरी परिसरात आणि मृत भाविकांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली असून, याप्रकरणी अपघाताची नोंद करून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number