Maharashtra Weather Update: विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस! राज्यातील ‘या’ 24 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही सागरी जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा प्रभाव दिसून येईल.

Maharashtra Weather Update: विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस! राज्यातील ‘या’ 24 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्यातील हवामानात पुन्हा एकदा अचानक मोठा बदल झाला असून हवामान खात्याने 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या कालावधीत अनेक भागांत विजांच्या प्रचंड कडकडाटासह आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा सुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही सागरी जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा प्रभाव दिसून येईल. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि नाशिकचा घाटमाथा या भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांत हवामान खात्याचा इशारा 

मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या 6 जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या 8 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा नसला, तरी या भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा शिडकाव होऊ शकतो.

हेही वाचा – Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्याच्या बैठकीतच गोंधळ! गिरीश महाजनांसमोर साधू-महंत संतापले; त्र्यंबक राजाच्या मुखवट्यावरून वाद

आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याचे आवाहन

राज्यभरात पावसाचे वातावरण असताना विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या 3 जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची शक्यता नसून तेथील हवामान पूर्णपणे कोरडे राहील, असे हवामान केंद्राने स्पष्ट केले आहे. अचानक उद्भवणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे झाडे पडणे, विजेचे खांब उन्मळून पडणे किंवा वीज पुरवठा खंडित होणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यलो अलर्ट असलेल्या क्षेत्रातील नागरिकांनी विशेषतः विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number