कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली होती. तसेच मुंबईची लाईफलाईन लोकलही सर्वसामांन्यांसाठी बंद करण्यात आली होती. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकिय सेवेतील कर्मचारी, सरकारी सेवेतील कर्मचारी यांना लोकलचे तिकीट मिळत असून त्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा होती. मात्र आजपासून रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे.
रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना पासची सक्ती रेल्वे प्रशासनाने केली आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे पासची सक्ती केल्यामुळे प्रवाशांना रेल्वे तिकीट मिळणार नाही. तसेच सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकीय सेवेतील कर्माचारी यांनासुद्धा रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकीट मिळणार नाही. रेल्वे प्रशासनाने रेल्वे पासची सक्ती केल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी लसीचे दोन मात्रा असणे बंधनकारक होते. मात्र कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांनाही आता रेल्वे तिकीट मिळणार नाही. रेल्वेप्रशासनाने पासची सक्ती केल्यामुळे आपातकालीन प्रवाशांनासुद्धा रेल्वेचे तिकीट मिळणार नाही आहे. त्यामुळे आता लोकलने प्रवास करण्यासाठी रेल्वे तिकीट न मिळाल्यामुळे प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजून रिक्षा, टॅक्सीने प्रवास करावे लागेल. किंवा बसने प्रवास करावा लागेल.