अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा आज निकाल, कुरुंदकरसह तिघांना शिक्षा सुनावली जाणार

अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या खळबळजनक प्रकरणाचा आज सोमवारी (दि. 21)  निकाल जाहीर होणार आहे.

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा आज निकाल, कुरुंदकरसह तिघांना शिक्षा सुनावली जाणार

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या खळबळजनक प्रकरणाचा आज सोमवारी (दि. 21)  निकाल जाहीर होणार आहे. मुख्य आरोपी अभय कुरुंदकर जो एकेकाळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक होता याला पनवेल सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असून, त्याच्यासोबत कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर यांनाही न्यायालयाने शिक्षा सुनावण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी 11वाजता या तिघांची अंतिम शिक्षा जाहीर होणार आहे. 

या गुन्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण पोलिस दलालाही हादरवले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, बिद्रे यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी शरीराचे तुकडे करून फेकण्यात आले. मुख्य आरोपी कुरुंदकरला हत्या आणि अपहरण प्रकरणी दोषी ठरवले असून, भंडारी व फाळणीकर या दोघांना पुरावे नष्ट केल्याबद्दल शिक्षा ठोठावली जाणार आहे.

सत्र न्यायाधीश कृ. प. पालदेवार यांनी 11 एप्रिल रोजी अंतिम निकाल जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, बिद्रे यांचे कुटुंबीय  मुलगी सिद्धी, पती राजू गोरे, वडील जयकुमार आणि भाऊ आनंद यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. या दरम्यान, सरकारी वकील प्रदीप घरत आणि बचाव पक्षाचे वकील विशाल भानुशाली यांच्यात तीव्र युक्तिवाद रंगला.

आज सकाळी10 वाजण्यापूर्वी आरोपींना बंदोबस्तात पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर 11 वाजता न्यायालयाचा अंतिम निर्णय येईल. या निकालाकडे बिद्रे कुटुंबीयांसह त्यांचे नातेवाईक, आळते गावातील ग्रामस्थ आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number