‘राज्य सरकार इंग्रजांप्रमाणे वागत आहे’ – ऍड. गुणरत्न सदावर्ते

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण्याच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र राज्यशासनाने एसटी कर्मचाऱ्यांची मांगणी पूर्ण होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबतचा निर्णय राज्य सरकारन घेतला. तरीही एसटी आंदोलकांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरूच ठेवले. यावर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वेतनवाढीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार हे […]

‘राज्य सरकार इंग्रजांप्रमाणे वागत आहे’ – ऍड. गुणरत्न सदावर्ते

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण्याच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र राज्यशासनाने एसटी कर्मचाऱ्यांची मांगणी पूर्ण होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबतचा निर्णय राज्य सरकारन घेतला. तरीही एसटी आंदोलकांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरूच ठेवले. यावर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वेतनवाढीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्य सरकार हे इंग्रजांप्रमाणे वागत असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारवर केला आहे. आम्हाला एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण हवे आहे. जोवर आम्हाला विलिनीकरण मिळत नाही तोवर आम्ही संप पुढे कायम ठेवणार असल्याचे ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. तसेच आंदोलन मागे घेतले नाही तर कडक कारवाई करण्याचा इशाराही राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. तसेच मविआने मुंबईतील आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली असून मविआने एसटी संपकऱ्यांचे पाणी तोडले आहे. मविआने संपकारी आंदोलकांचा आझाद मैदनातील पाणीपुरवठा बंद केला आहे. मविआने संपकारी कर्मचाऱ्यांचे तोंडचे पाणी तोडल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले तर आणखी करड कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number