मंगळवारी धुलीवंदन आहे आणि या दिवशी मांसाहार मोठया प्रमाणात केला जातो. बारामती शहर आणि ग्रामीण भागात खवय्यांनी चिकन, मटन, मासे खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळाले. चिकन २४० मासे १०० रुपये तर मटन ७०० रुपये किलो दर ठेवण्यात आला आहे. मटणाचा आजच्या धुलीवंदन दिवशी ६० रुपये भाव वाढल्याने खवय्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मटण, तसा मांसाहारी खवैय्यांच्या अगदीच जिव्हाळ्याचा विषय. मटणाचे नाव उच्चारले, तरी झणझणीत मसाला घालून बनवलेल्या चविष्ठ मटणाचे ताट डोळ्यासमोर तरळते, तोडांला अक्षरशः पाणीही सुटते. पण तुमच्या जिभेला जरा आवर घालाचं ! कारण सध्या मटण म्हंटले कि, त्याच्या चवीपेक्षा भावाचाच जास्त विचार करण्याची वेळ आली आहे. ६४० रुपये किलो दराने मिळणारे मटण आता ७०० रुपयांपर्यंत पोचले आहे.
मटणासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागताना दिसत आहेत. धुलिवंदन आणि मटणाचं नातं मांसाहारप्रेमींना वेगळं सांगण्याची गरज नाही. मागणी वाढल्याने मटणाचा दर ७०० रुपये किलोवर पोहचला आहे.