देशात सक्रिय रुग्णांची संख्या ४४ हजारांवर

देशात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ८ हजार ५८२ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत असताना गेले काही दिवस कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची धोक्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात २,९२२ रुग्णांची भर […]

देशात सक्रिय रुग्णांची संख्या ४४ हजारांवर

देशात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ८ हजार ५८२ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत असताना गेले काही दिवस कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची धोक्याचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात २,९२२ रुग्णांची भर

या आठवड्यामध्ये सातत्याने रुग्णसंख्येमध्ये होत असलेली वाढ पाहता ही करोना संसर्गाची चौथी लाट आहे का, यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चा सुरू झाली आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरीही करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या नियंत्रणात आहे. त्यात मोठ्या संख्येने वाढ झालेली नाही.राज्यात २,९२२ नवीन करोनाबाधितांचे निदान झाले. राज्यात सध्या १४,८५८ उपचाराधीन रुग्ण आहेत. राज्यात दिवसभरात १,३९२ करोनारुग्ण बरे होऊन घरी परतले, तर आजपर्यंत एकूण ७७ लाख ४४ हजार ९०५ करोनारुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९४ टक्के इतके आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number