लोकार्पण पंतप्रधान मोदीच करणार

नव्या संसद भवनाच्या इमारतीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे रोजी करणार आहेत. आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि पंतप्रधानांना संसद भवनाच्या इमारतीच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले. लोकसभा सचिवालयाच्या माहितीनुसार नव्या संसद भवनाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. भारतीय संसदेची नवी वास्तू विकसित भारताच्या संकल्पाचे प्रतिक ठरणार आहे, असे प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष […]

लोकार्पण पंतप्रधान मोदीच करणार

नव्या संसद भवनाच्या इमारतीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे रोजी करणार आहेत. आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि पंतप्रधानांना संसद भवनाच्या इमारतीच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले. लोकसभा सचिवालयाच्या माहितीनुसार नव्या संसद भवनाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे.

भारतीय संसदेची नवी वास्तू विकसित भारताच्या संकल्पाचे प्रतिक ठरणार आहे, असे प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यानी द्विटद्वारे केले आहे. देशाच्या नव्या संसदेची उभारणी पूर्ण झाली असून येत्या २८ मे रोजी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे.

नवे संसद भवन चार मजली असून या इमारतीमध्ये मंत्री आणि पक्ष कार्यालयाबरोबरच प्रत्येक खासदारासाठी कार्यालयाची स्वतंत्र खोली असणार आहे. जुन्या संसद भवनापेक्षा नव्या संसदेचे स्वरुप भव्य असे आहे. या संसद भवनाचे कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेचे डिझाइन एनआयएफटीने केलेले आहे. नवे संसद भवन सेंट्रल विस्टा पुनर्विकासाचा एक हिस्सा आहे. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंत तीन किलोमीटर रस्त्यांचे पुनर्बांधणी, एक केंद्रीय सचिवालय, पंतप्रधानासाठी नवे कार्यालय आणि निवास अशा इमारतींची निर्मिती या योजनेव्दारे केली जात आहे.

लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी द्विटद्वारे संसदेच्या नव्या वास्तूविषयी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, संसदेची नवनिर्मित इमारत भारताच्या गौरवशाली लोकशाही परंपरा आणि घटनात्मक मूल्यांना अधिक समृद्ध करेल. या इमारतीमध्ये सन्माननीय सदस्य देश आणि नागरिकाप्रती असलेली जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील. देशात पंतप्रधान २८ मे रोजी ही इमारत राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्याचप्रमाणे १४० कोटींहून अधिक देशवासीयांच्या आशा आणि अपेक्षांची पूर्तता करून, संसदेची नवनिर्मित इमारत २०४७ सालापर्यंत विकसित भारत घडवण्याचा आपला संकल्प साध्य करण्यासाठी एक सशक्त माध्यम बनेल, असाही विश्वास बिर्ला यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number