येणाऱ्या काळात मुख्यमंत्री आपलाच असेल – धनंजय मुंडे

‘येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री हा आपलाच असेल’, असे भाकित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. साताऱ्यातील डिस्कळ येथील शेतकरी मेळावाच्या सभेत धनंजय मुंडे यांनी हे विधान केले आहे. धनंजय मुंडे यांनी शेतकरी मेळाव्यात मविआमधील शिवसेनेच्या आमदारांवही अप्रत्यक्ष टीका केली आहे. यावेळी त्यांना पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रिपदाचे […]

येणाऱ्या काळात मुख्यमंत्री आपलाच असेल – धनंजय मुंडे

‘येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री हा आपलाच असेल’, असे भाकित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. साताऱ्यातील डिस्कळ येथील शेतकरी मेळावाच्या सभेत धनंजय मुंडे यांनी हे विधान केले आहे.

धनंजय मुंडे यांनी शेतकरी मेळाव्यात मविआमधील शिवसेनेच्या आमदारांवही अप्रत्यक्ष टीका केली आहे. यावेळी त्यांना पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रिपदाचे खाते हे आपल्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, ‘पवार साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्षनेत्यांची जबाबदारी दिली होती. पाच वर्षे विरोधी पक्षनेता होतो आणि ती जबाबदारी पार पडली. आज शब्द देतो, सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचा मंत्री म्हणून येणाऱ्या काळात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचं मंत्रिपद द्यायचं कुणाला? जे कुणी मुख्यमंत्री असतील… ते आपलेच असतील. ते म्हणतील हे विभाग आपल्या शिवाय दुसऱ्या कुणालाच नको.’

पटोलेंचा मुंडेंना टोला  

दरम्यान, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टोला लगावला आहे. काहींना दिवसाही स्वप्न पडतात, असा टोला नाना पटोलेंनी धनंजय मुंडेंना लगावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number