Mumbai News : खेळता खेळता तलावात बुडाला; तब्बल आठ तासांनंतर एनडीआरएफच्या टीमला सापडला चिमुकल्याचा मृतदेह

मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातील खदान तलावात बुडालेल्या दहा वर्षीय मुलाचा मृतदेह अखेर सापडला आहे. एनडीआरएफच्या पथकाने सुमारे आठ तास चाललेल्या शोधमोहीमेनंतर मुलाचा मृतदेह बाहेर काढला. या दुर्दैवी घटनेनंतर काँग्रेसने प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तलाव परिसरात सुरक्षारक्षकांची नियुक्ती नसल्यामुळे अशा ठिकाणी मुलांच्या बुडून मृत्यूच्या घटना घडत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात […]

Mumbai News : खेळता खेळता तलावात बुडाला; तब्बल आठ तासांनंतर एनडीआरएफच्या टीमला सापडला चिमुकल्याचा मृतदेह

मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातील खदान तलावात बुडालेल्या दहा वर्षीय मुलाचा मृतदेह अखेर सापडला आहे. एनडीआरएफच्या पथकाने सुमारे आठ तास चाललेल्या शोधमोहीमेनंतर मुलाचा मृतदेह बाहेर काढला. या दुर्दैवी घटनेनंतर काँग्रेसने प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तलाव परिसरात सुरक्षारक्षकांची नियुक्ती नसल्यामुळे अशा ठिकाणी मुलांच्या बुडून मृत्यूच्या घटना घडत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी युथ काँग्रेसचे सुफियान हैदर यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तसेच अशा धोकादायक तलावांभोती योग्य सुरक्षा व्यवस्था आणि कायमस्वरूपी सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : Pune Crime : एकत्र दारू प्यायला बसले, क्षुल्लक वाद झाला अन् तरुण रक्ताच्या थारोळ्यात दिसला; पुण्यातील धक्कादायक घटना

 सविस्तर माहिती अशी कशी – 

अंधेरी पश्चिम भागात सोमवारी दुपारी इतर मुलांसोबत पोहण्यासाठी एका तलावात उतरलेला १० वर्षांचा मुलगा बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेला मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अंधेरी (पश्चिम) मधील डी. एन. नगर येथील जुहू गल्लीतील 'वायरलेस कंपाऊंड'मध्ये, जागृत हनुमान मंदिराच्या मागे दुपारी सव्वा-एकच्या सुमारास घडली. घटनेबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवळच असलेल्या झोपडपट्टीतील दोन ते तीन मुले एका खाजगी जागेवर असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेली होती. या दरम्यान त्यातील एक मुलगा बुडाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) नागरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता मुलाची ओळख दिनेश बसवराज हरिजन (वय 10) अशी पटली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने (MFB) शोधमोहीम सुरू केली. तसेच, घटनास्थळी पोलीस कर्मचारी आणि 108 क्रमांकाची रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number