धुळवडिनिम्मित्त, अलिबागमधील कोळीवाड्यात पारंपारिक होडी स्पर्धा

जय महाराष्ट्र न्यूज, अलिबाग  होळीनंतर आलेला धुळवडीचा सण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झालाय. यानिमित्ताने अलिबाग तालुक्यातील साखर कोळीवाडा येथे कोळी समाजातर्फे वल्ह्याच्या पारंपारिक होडी चालवण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यांत्रिकीकरणाच्या युगात पारंपारिक होड्या अडगळीत पडल्या आहेत. अशावेळी कोळी समाजाची मूळ परंपरा टिकून राहावी आणि नव्या पिढीला याची माहिती मिळावी या हेतूने या […]

धुळवडिनिम्मित्त, अलिबागमधील कोळीवाड्यात पारंपारिक होडी स्पर्धा

जय महाराष्ट्र न्यूज, अलिबाग

 होळीनंतर आलेला धुळवडीचा सण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झालाय. यानिमित्ताने अलिबाग तालुक्यातील साखर कोळीवाडा येथे कोळी समाजातर्फे वल्ह्याच्या पारंपारिक होडी चालवण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

यांत्रिकीकरणाच्या युगात पारंपारिक होड्या अडगळीत पडल्या आहेत. अशावेळी कोळी समाजाची मूळ परंपरा टिकून राहावी आणि नव्या पिढीला याची माहिती मिळावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

या स्पर्धेचे आयोजन डॉ. कैलास चौलकर यांनी केले. जवळपास 100 स्‍पर्धकांनी या स्‍पर्धेत भाग घेतला होता. स्‍पर्धक गेले महिनाभर याचा सराव करत होते.  या स्‍पर्धा पाहण्‍यासाठी नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती. स्‍पर्धा जिंकण्‍यासाठी चाललेली चढाओढ आणि त्‍यांना प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद यामुळे उत्‍साही वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धा संपल्यानंतर  विजेत्‍या स्‍पर्धकांना पारितोषिके देण्‍यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number