Maharashtra Rain Forecast: बळीराजासाठी सर्वात मोठी खूशखबर! राज्यात पावसाचे जोरदार पुनरागमन; ‘या’ दिवसापासून बरसणार

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन होणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

Maharashtra Rain Forecast: बळीराजासाठी सर्वात मोठी खूशखबर! राज्यात पावसाचे जोरदार पुनरागमन; ‘या’ दिवसापासून बरसणार

Maharashtra Rain Forecast: ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेल्या मोठ्या विश्रांतीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला होता आणि पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम झाला होता. मात्र, आता बळीराजासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन होणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. 1 आणि 2 सप्टेंबरदरम्यान पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बारामती आणि पंढरपूर या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच 6, 7 आणि 8 सप्टेंबर रोजी या परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून शेतातून पाणी वाहून निघेल इतका पाऊस काही भागांत पडू शकतो.

कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाची हजेरी

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. पालघरपासून ते कोल्हापूरपर्यंतच्या संपूर्ण किनारपट्टीवर आणि घाटमाथ्यावर चांगल्या पावसाच्या सरी कोसळतील. या पावसामुळे सुकत आलेल्या खरीप पिकांना मोठे जीवदान मिळणार असून, पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात हलका होण्यास मदत होईल.

हेही वाचा – Beed Crime : गायी-म्हशी घेण्यासाठी माहेरून 10 लाख आणण्याचा तगादा; सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने केलं असं काही…; बीड हादरलं

विदर्भात 4 सप्टेंबरपासून धुवाधार; मराठवाड्यातही पावसाची शक्यता

हवामान अंदाजानुसार, विदर्भात 4 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे. विशेषतः नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावेल. दुसऱ्या बाजूला मराठवाड्यातील बीड आणि जालना या जिल्ह्यांतही याच कालावधीत स्थानिक पातळीवर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यातील प्रदीर्घ खंडानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच होणाऱ्या या पावसामुळे राज्यातील कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number