Paithan Accident : पैठणमध्ये भीषण अपघात! वाहनाची जोरदार धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

पैठणहून खाजगी काम आटोपून दुचाकीवरून गावी परतणाऱ्या एका दुचाकीला अज्ञान वाहनाने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Paithan Accident : पैठणमध्ये भीषण अपघात! वाहनाची जोरदार धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

विजय चिडे, प्रतिनिधी

पैठणहून खाजगी काम आटोपून दुचाकीवरून गावी परतणाऱ्या एका दुचाकीला अज्ञान वाहनाने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैठण तालुक्यातील पाचोड-पैठण रस्त्यावरील लिंबगाव फाट्यावर गुरूवारी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. भिमराव रामचंद्र हारे वयवर्षे 38 यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील भिमराव रामचंद्र हारे हे गुरवारी सकाळपासून खाजगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान ते आपल्या दुचाकीवरुन परतत असताना पाचोड – पैठण रस्तावरील लिंबगाव येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ज्यात त्याची दुचाकी लांबपर्यंत फरपडत गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातांची माहिती स्थानिक नागरिकांना मिळतातच त्यांनी तातडीने पाचोड पोलिस ठाण्यात या अपघातांची माहिती दिली आहे.

यावेळी पाचोड पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राम बहाराते, बीट जमादार आण्णासाहेब गव्हाणे, पोलिस कर्मचारी हरीहर तांदाळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला 108 रुग्नवाहिकेच्या मदतीने पाचोड ग्रामीण रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश साबळे यांनी भिमराव रामचंद्र हारे  यांना तपासून त्यांना मयत घोषीत केले. सदरील घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास बीट जमादार आण्णासाहेब गव्हाणे करीत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number