ठाण्यात टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात टेम्पो चालकाने इतर २ मोठ्या वाहनांना धडक दिली आहे.
या धडकेत २ जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हा टेम्पो ठाण्यातून मुंबईच्या दिशेने कोंबड्या घेऊन जात होता. परंतु चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. तीन हात नाका या ठिकाणी हा अपघात झाला.
हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला आहे.
या अपघातामुळे तीन हात नाका पूल उतरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान आता वाहतूक पूर्वपदावर आली आहे.