नाना पाटेकर यांच्यानंतर तनुश्री दत्ताची आमिर खानवर आगपाखड!

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर केवळ Bollywood च नव्हे, तर इतर क्षेत्रातही #MeToo चं लोण पसरलं. नाना पाटेकर यांच्यानंतर आलोकनाथ, साजिद खान, सुभाष कपूर यांसारखे सिनेसृष्टीतील अनेक लोक #MeToo च्या कचाट्यात अडकली. अनेक projects मधून त्यांना काढून टाकण्यात आलं. अनेक स्टार्सनी त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला. यातील सुभाष कपूर  (subhash kapoor) […]

नाना पाटेकर यांच्यानंतर तनुश्री दत्ताची आमिर खानवर आगपाखड!

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर केवळ Bollywood च नव्हे, तर इतर क्षेत्रातही #MeToo चं लोण पसरलं. नाना पाटेकर यांच्यानंतर आलोकनाथ, साजिद खान, सुभाष कपूर यांसारखे सिनेसृष्टीतील अनेक लोक #MeToo च्या कचाट्यात अडकली. अनेक projects मधून त्यांना काढून टाकण्यात आलं. अनेक स्टार्सनी त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला. यातील सुभाष कपूर  (subhash kapoor) या दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यामुळे सुपरस्टार अमिर खानने त्याच्यासोबत सिनेमा करण्यास नकार दिला होता. मात्र आता त्याने सुभाष कपूरसोबत सिनेमा करायची तयारी दर्शवली आहे. यामुळे तनुश्री दत्ताचा मात्र चांगलाच तीळपापड झाला आहे. अमिर खानवर तिने आगपाखड केली आहे.

अमिर खान का झाला तयार?

‘जॉली LLB’ सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्या आगामी सिनेमात अमिर खान काम करणार आहे. कपूर यांच्यासोबत काम करायला आधी तो तयार नव्हता. मात्र आपल्या नकारामुळे हा सिनेमाच बंद होतोय आणि त्यामुळे नकळतपणे एका व्यक्तीला आणि सिनेमाशी संबंधित अनेक लोकांना नाहक त्रास भोगावा लागणार आहे, या कल्पनेने आपल्याला झोप लागत नव्हती, असं अमिर खानने म्हटलंय. हाच विचार करून आपण अखेर हा सिनेमा स्वीकारायचं ठरवलं असल्याचंही अमिर म्हणाला.

मात्र तनुश्री दत्ताला (Tanushri Dutta) आमिर खानचा (Amir khan) निर्णय ऐकून राग आला आहे.

काय म्हणाली तनुश्री दत्ता?

एखादी महिला जेव्हा अत्याचाराला बळी पडते, ज्यामुऴे ती चित्रपटात काम करू शकत नाही, तेव्हा बॉलिवूडमधील कोणाचीच का झोप उडत नाही? असा प्रश्न तनुश्रीने उपस्थित केला आहे.

जर आमिर सुभाष कपूरला काम देऊ शकतो तर अत्याचाराला बळी पडलेल्या गीतिका त्यागीला का नाही, असं तिने विचारलंय.

तसंच बॉलिवूडमधील भीतीदायक पुरूषांना सहानुभूती का मिळते, असाही सवाल तिने केलाय.

‘हॉर्न ओके प्लीज’ या 2009 च्या चित्रपटांनंतर मलाही काम मिळणे बंद झाले, तेव्हा तू काय करतेयस, असं मला कुणीही विचारलं नाही.

तेव्हा अमिर खानला माझ्याबद्दल कळवळा का नाही आला? असा प्रश्न तनुश्रीने आमिरला केला.

अत्याचार करणारे समाजात ताठ मानेने वावरत आहेत, हे पाहताना पिडीतेला होणाऱ्या वेदनेची जाण ठेव, असा सल्ला तनुश्रीने अमिरला दिलाय. जर अमिर खानसारखा विचार करून प्रत्येक शोषण करणाऱ्या पुरुषाला काम मिळालं तर समाजाला अत्याचारमुक्त करण्याची कल्पना स्वप्नातच राहील, अशी खंतही तनुश्रीने व्यक्त केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number