Pune News : धक्कादायक! रुग्णालय परिसरात बॉम्ब आढळल्याने खळबळ; परिसर सील, वाहतुकीत बदल, नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

पुण्यातील हडपसर परिसरात एका नामांकित रुग्णालयासमोर संशयास्पद वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Pune News : धक्कादायक! रुग्णालय परिसरात बॉम्ब आढळल्याने खळबळ; परिसर सील, वाहतुकीत बदल, नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात एका नामांकित रुग्णालयासमोर संशयास्पद वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी सुरू केली. बॉम्बशोधक आणि नाशक पथक अर्थात बीडीडीएसची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून संशयास्पद वस्तू ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी रवाना झाली आहे. यावेळी अग्निशमन दलासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत.

हेही वाचा : Namkarn Aware Arrest: खरात प्रकरणाचा सस्पेन्स वाढला; रुपाली चाकणकरांच्या चौकशीनंतर नामकर्ण आवारेंना बेड्या

पुण्यातील हडपसर परिसरात कामधेनु इस्टेटमधील एका प्रतिष्ठित सुपर स्पेशालिस्ट खासगी हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये एक जीवंत बॉम्ब आढळल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीएस) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. येथे सापडलेल्या या बॉम्बमध्ये सात तासांचा टायमर सेट केलेला होता. बीडीएस पथकाने अत्यंत सावधगिरीने तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बॉम्बची तपासणी पूर्ण केली. तसेच त्याला सुरक्षित ठिकाणी हलवले. ही घटना हॉस्पिटलच्या आत घडल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांच्यात प्रचंड गोंधळ उडाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील हालचाली तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात आल्या. दरम्यान, पोलीस आणि संबंधित सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, हॉस्पिटलमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची नोंद, त्यांची हालचाल आणि उपलब्ध तांत्रिक पुरावे यावर पोलिसांचे बारीक लक्ष आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number