Sushma Andhare On Phaltan Docter Death Case: ‘या’ लोकांना चौकशीच्या कक्षात घेणार का?, अंधारेंचा पोलीस उपअधीक्षक खांबेंना सवाल

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी तिच्या कुटुंबियांसह सुषमा अंधारे यांनी फलटणला जाऊन तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली.

Sushma Andhare On Phaltan Docter Death Case: ‘या’ लोकांना चौकशीच्या कक्षात घेणार का?, अंधारेंचा पोलीस उपअधीक्षक खांबेंना सवाल

 

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी तिच्या कुटुंबियांसह सुषमा अंधारे यांनी फलटणला जाऊन तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण पोलीस स्टेशनच्या बाहेरच कित्येक वेळ अंधारे यांना अडविण्यात आले होते. अखेर त्यांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक खांबे यांनी सुषमा अंधारे यांच्याशी चर्चा केली. तपासाचा भाग असलेल्या गोष्टी मी जाहीरपणे सांगू शकत नाही, यावर ते कायम राहिले. त्यावर तपासातल्या गोष्टी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सार्वजनिकरित्या का सांगितल्या? त्यांनी मुलीचे चारित्र्यहनन का केले? असे प्रश्न अंधारे यांनी केले. तसेच चाकणकर यांच्या शेजारी बसलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी काहीच का बोलले नाहीत, त्यांनी चाकणकर यांना का थांबवले नाही, असेही अंधारे यांनी विचारले. त्यावर पोलीस उपअधीक्षक खांबे निरुत्तर झाले.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरला न्याय देण्यासाठी आणि पोलीस तपासाच्या अनुषंगाने काही हस्तक्षेप नोंदविण्यासाठी सुषमा अंधारे यांनी फलटण पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यांच्याबरोबर बऱ्याच महिला आणि पीडित महिला डॉक्टरचे कुटुंबीय देखील होते. अंधारे यांचा रोख तपास अधिकारी तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर होता. आमची मुलगी गेली तरीही तिची बदनामी थांबत नाही, आमच्या मुलीच्या चारित्र्यहननाचा अधिकार चाकणकर यांना कुणी दिला? असा सवाल अंधारे यांनी केला.

हेही वाचा: Uddhav Thackrey On Farmers’ Aid: शेतकऱ्यांची थट्टा थांबवा! उद्धव ठाकरे यांचा सरकारवर जोरदार प्रहार

त्या सहा लोकांना तुम्ही आरोपी करणार का? सुषमा अंधारे यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. मात्र पोलीस उपअधीक्षक (DYSP) खांबेंचे वारंवार एकच उत्तर होतं. पोलीस उपअधीक्षक राहुल धस, आरोग्य अधिकारी अंशुमन धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक जायपात्रे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आणि माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक शिंदे आणि नागटिळक यांना चौकशीच्या कक्षात घेणार का? असा प्रमुख सवाल अंधारे यांनी विचारला. त्यावर हा तपासाचा भाग आहे, मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही, असे पोलीस उपअधीक्षक खांबे म्हणाले.

पीडित डॉक्टरचा मृत्यूपूर्वी जबाब आहे, अनेक नावे तिने जबाबात घेतली आहेत. मग तरीही गुन्हा का दाखल करत नाही? त्यांना लगेच अटक करा असे माझे म्हणणे नाही परंतु त्यांना चौकशीच्या कक्षेत का घेत नाही? असे अंधारे यांनी विचारले. त्यावर तपासाचा भाग आहे, असे खांबे वारंवार उत्तर देत राहिले. खांबे म्हणाले, “माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार तपासाचा जो विहित कालावधी आहे, त्यानुसार तपास पूर्ण कारवाई करेन. तसेच तुम्ही सांगितलेल्या व्यक्तींना आरोपी करणे हे तपासाचा भाग असल्याने त्यांना आरोपी करणार की नाही, त्यांची चौकशी होणार की नाही, कशी होणार याची उत्तरे मी आताच देऊ शकत नाही.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number