जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्नाटक विधानसभेच्या सभापतीपदी आपले विराजपेठ येथील आमदार के.जी. बोपय्या यांना बसवलं आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपचे आमदार के.जी. बोपय्या यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यावर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला असून हा राज्यघटनेचा अवमान आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे.याविरोधात काँग्रेसने कोर्टात धाव घेतली होती.
आज सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. काँग्रेसकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार बाजू मांडली. हंगामी अध्यक्ष बदलण्याचे आदेश आम्ही राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. तसंच कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी होऊ द्या. याच थेट प्रक्षेपण करा, यामुळे पारदर्शकता येईल असा दिलासाही कोर्टाने काँग्रेसला दिला.
कोण आहेत के. जी. बोपय्या ?
बोपय्यांच्या निवडीवरुन काॅंग्रेसचं टीकास्त्र
येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत