वृत्तसंस्था, नवी दिल्ली नियमित सरावासाठी गेलेलं हवाई दलाचं सुखोई- 30 हे विमान बेपत्ता झाले आहे. आसामच्या तेजपूरमधून नियमित सरावासाठी या विमानाने उड्डाण केले. तेजपूरपासून 60 किमी अंतरावर असताना विमानाचा रडारशी संपर्क तुटला. सुखोई 30 या बेपत्ता विमानाचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.