Sugar Price Drop: सर्वसामान्यांना मोठा दिलासा; साखरेचे भाव 25 टक्क्यांनी घसरले, साठा ठेवण्याच्या मर्यादेत 30 दिवसांपर्यंत वाढ

विशेषतः सणासुदीच्या काळात साखरेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो, त्यामुळे वाढत्या किमतींमुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत होती.

Sugar Price Drop: सर्वसामान्यांना मोठा दिलासा; साखरेचे भाव 25 टक्क्यांनी घसरले, साठा ठेवण्याच्या मर्यादेत 30 दिवसांपर्यंत वाढ

Sugar Price Drop: गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या वाढत्या दरांमुळे सामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसत होता. विशेषतः सणासुदीच्या काळात साखरेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो, त्यामुळे वाढत्या किमतींमुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखरेच्या साठवणुकीबाबतच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या निर्णयामुळे येत्या काळात किरकोळ बाजारात साखरेचे भाव आणखी कमी होऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

साखर साठवणुकीच्या नियमांत बदल; आयात साखरेसाठी विशेष अट

केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर साखर खरेदी करणाऱ्या कंपन्यांसाठी आणि वापरकर्त्यांसाठी साठा ठेवण्याची मर्यादा 15 दिवसांवरून वाढवून 30 दिवसांपर्यंत केली आहे. मात्र, सरकारने यासोबत एक महत्त्वाची अट लागू केली आहे. 15 दिवसांच्या मर्यादेपेक्षा जास्त असलेला अतिरिक्त साठा हा केवळ आयात केलेल्या साखरेचाच असावा. विशेषतः 'ॲडव्हान्स ऑथोरायझेशन स्कीम' किंवा 'टॅरिफ रेट कोटा' अंतर्गत मिळवलेली साखरच या अतिरिक्त साठ्यात समाविष्ट करता येईल. स्थानिक खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या साखरेच्या साठवणुकीची मर्यादा मात्र 15 दिवसांवरच कायम राहील.

साखर कारखान्यांच्या पातळीवर 25 टक्के घट 

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात साखरेचा किरकोळ दर 65 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर त्यात घट होऊन तो सुमारे 58.50 रुपये प्रति किलोवर आला आहे, म्हणजेच किरकोळ दरात सुमारे 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. दुसरीकडे, साखर कारखान्यांच्या पातळीवर साखरेचे भाव तब्बल 25 टक्क्यांनी कमी झाले आहेत. कारखान्यांच्या पातळीवर मिळालेला हा मोठा दिलासा अद्याप सामान्य ग्राहकांपर्यंत पूर्णपणे पोहोचलेला नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Tata Sons Chairman: टाटा ग्रुपमध्ये अंतर्गत मतभेद; चंद्रशेखरन यांची पुनर्निवड, नोएल टाटांचा निर्णयाला तीव्र विरोध

ग्राहकांना अधिक दिलासा मिळण्याची शक्यता

साखरेचे घाऊक दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे सरकारने व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांना या दरकपातीचा थेट फायदा सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. सरकारच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि साठवणुकीच्या नव्या नियमांमुळे आगामी काळात साखरेचे किरकोळ दर आणखी घसरतील, ज्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number