जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून कर्जमाफीची रक्कम गायब होण्याची घटना घडत असतानाच महिनाअखेरपर्यंत शेतकऱ्यांचे सातबारा कोरे होणारच, असा दावा राज्य सरकारनं केला आहे.
कर्जमाफीची प्रक्रिया धीमागतीने सुरू असल्याचा आरोप फेटाळताना सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, बँकांकडे आलेल्या माहितीची छाननी सुरू आहे.
2009 पासूनचा शेतकरी वंचित राहणार नाही. नवे आधारकार्ड काढून शेतकऱ्यांना लाभ देणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. आयटी विभागाचे प्रधान सचिव विजय गौतम हे खासगी कामासाठी रजेवर गेले असल्यचा खुलासाही त्यांनी केला.