School Shooting: विद्यार्थ्याने वडिलांची बंदूक चोरून शाळेत घडवलं तांडव; अंदाधुंद गोळीबारात शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह 4 जणांचा मृत्यू

एका विद्यार्थ्याने शाळेच्या दोन वर्गखोल्यांमध्ये शिरून अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह 4 जणांचा मृत्यू झाला असून किमान 20 जण जखमी झाले आहेत.

School Shooting: विद्यार्थ्याने वडिलांची बंदूक चोरून शाळेत घडवलं तांडव; अंदाधुंद गोळीबारात शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह 4 जणांचा मृत्यू

School Shooting: दक्षिण-पूर्व तुर्कीमधील एका शाळेत बुधवारी रक्ताचा सडा पडला. एका विद्यार्थ्याने शाळेच्या दोन वर्गखोल्यांमध्ये शिरून अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह 4 जणांचा मृत्यू झाला असून किमान 20 जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वडिलांच्या बंदुकांमधून झाडल्या गोळ्या
कहरामनमाराश प्रांताचे गव्हर्नर मुअम्मर उनलुअर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारा विद्यार्थी स्वतःदेखील या घटनेत ठार झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या विद्यार्थ्याने त्याचे वडील, जे एक निवृत्त पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्या बंदुका चोरून शाळेत आणल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याकडे पाच शस्त्रे आणि सात मॅगझिन्स (काडतुसांचे साठे) आढळून आले आहेत. यावरून त्याने मोठ्या हत्येचा कट आखल्याचे दिसून येत आहे.

तपास सुरू; मृतांमध्ये शिक्षकाचा समावेश
या भीषण हल्ल्यात एका शिक्षकाचा आणि तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. ओनिकिशुबात जिल्ह्यातील या शाळेत गोळीबाराचा आवाज येताच एकच पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण शाळेला वेढा घातला आणि जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तुर्कीच्या न्याय मंत्रालयाने या प्रकरणाच्या सखोल तपासाचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – US New Conditions for Iran: चर्चेच्या दुसऱ्या फेरीआधी 'या' दोन अटींवर अमेरिका ठाम; कडक भूमिकेने वाढला तणाव

तुर्कीत दोन दिवसांत गोळीबाराची दुसरी घटना
विशेष म्हणजे, या घटनेच्या अवघ्या एक दिवस आधी मंगळवारी शेजारच्या 'शानलिउर्फा' प्रांतातील एका हायस्कूलमध्येही अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. तेथे एका माजी विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात 16 जण जखमी झाले होते. त्या हल्ल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. तुर्कीमधील शाळांमध्ये लागोपाठ घडणाऱ्या या सशस्त्र हल्ल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयांत उपचार सुरू असून पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number