Heavy Rainfall Forecast: राज्यावर अस्मानी संकट! पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे; 9 जिल्ह्यांना यलो तर 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

पुढील परिस्थिती पाहता 8 जुलैसाठी राज्यातील 9 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' तर 2 जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Heavy Rainfall Forecast: राज्यावर अस्मानी संकट! पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे; 9 जिल्ह्यांना यलो तर 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

Heavy Rainfall Forecast: महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मान्सूनचा जोर वाढला असून हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 7 जुलै रोजी अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' देण्यात आला होता. आता पुढील परिस्थिती पाहता 8 जुलैसाठी राज्यातील 9 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' तर 2 जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत असताना, दुसरीकडे नंदुरबारसारख्या काही जिल्ह्यांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे.

विभागनिहाय पावसाचा अंदाज 

कोकण आणि मुंबई परिसर: पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने तेथे 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र: पुणे शहर आणि आसपासच्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. मात्र, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर धो-धो पावसाची शक्यता लक्षात घेऊन 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या घाटमाथ्यासाठी 'यलो अलर्ट' असून सांगली, सोलापूर आणि सातारा मैदानी भागात हलक्या सरींचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्र: नाशिकच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबारच्या मैदानी भागात मध्यम तर अहिल्यानगरमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

विदर्भ आणि मराठवाडा: विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. मात्र, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळमध्ये सध्या पावसाची शक्यता नाही. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या 8 जिल्ह्यांत केवळ हलक्या पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा – Weather Update: एका बाजूला मुसळधार पावसाचा कहर, दुसरीकडे दुष्काळाची झळ! मान्सूनच्या बदलत्या पॅटर्नमागे नेमकं कारण काय?

प्रशासनाकडून सुरक्षेचे आवाहन
सततच्या पावसामुळे नद्या आणि नाले यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये अधिक धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी विनाकारण प्रवास करणे टाळावे, पूरसदृश परिस्थितीत नदी-नाले ओलांडण्याचे धाडस करू नये आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number