जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर
मोहोळ तालुक्यातील पोफळी येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार होऊन देखील मोहोळ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आणि आरोपींना पाठीशी घातले असा आरोप पीडितेने केला आहे. त्यानंतर आरोपींनी पुन्हा पीड़ितेला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेनंतर आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांकडून उलट पीडित कुटुंबीयांवरच गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे आरोपी तर मोकाट आहेतच शिवाय अल्पवयींन तरुणीला पुन्हा अत्याचाराचा सामना करावा लागला आहे. या संपूर्ण घटनेमुळे सोलापूरच्या पोलीस प्रशानाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जातोय.