Shweta Tiwari: ‘मुंडे साहेब, आता झुरळे घरांपर्यंत पोहोचतायत…’; श्वेता तिवारीने व्हिडीओ शेअर करत थेट FDA आयुक्तांकडे मांडली व्यथा

या प्रकारामुळे प्रचंड संतप्त झालेल्या श्वेता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार नोंदवून कारवाईची मागणी केली आहे.<br/>

Shweta Tiwari: ‘मुंडे साहेब, आता झुरळे घरांपर्यंत पोहोचतायत…’; श्वेता तिवारीने व्हिडीओ शेअर करत थेट FDA आयुक्तांकडे मांडली व्यथा

Shweta Tiwari: प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री श्वेता तिवारी यांनी नुकताच ऑनलाइन किराणा सामान आणि पेये मागवताना आलेला एक अत्यंत किळसवाणा आणि धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका लोकप्रिय ‘क्विक-कॉमर्स’ (जलद डिलिव्हरी) ॲपवरून मागवलेल्या सॉफ्ट ड्रिंकसोबत थेट एक जिवंत झुरळ त्यांच्या घरी पोहोचले. या प्रकारामुळे प्रचंड संतप्त झालेल्या श्वेता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार नोंदवून कारवाईची मागणी केली आहे.

सोफ्यावर सरपटताना दिसले झुरळ; व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

श्वेता तिवारी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या घरातील सोफ्यावर आणि फर्निचरवर एक झुरळ मोकळेपणाने सरपटताना स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी उपरोधात्मक टिप्पणी केली की, “आम्ही फक्त एक पेय मागवले होते, पण त्यासोबत हा न बोलावलेला पाहुणाही आला असून तो आता घरभर फिरत आहे.” श्वेता आणि त्यांच्या मित्रांनी या प्रकाराला मिश्किलपणे हाताळण्याचा प्रयत्न केला असला, तरी क्विक-कॉमर्स कंपन्यांच्या या निष्काळजीपणावर आणि अन्न सुरक्षेच्या धिंडवड्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Dadar RTO Action: मराठी न बोलणाऱ्या चालकांवर RTO चा बडगा; दादर स्थानक परिसरात भरारी पथकाची धडक कारवाई

‘तुकाराम मुंडे साहेब, आता झुरळे घरांपर्यंत पोहोचतायत!’; एफडीए आयुक्तांकडे दाद

व्हिडिओच्या शेवटी श्वेता यांनी महाराष्ट्र एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांना थेट टॅग करत या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले. “श्री. मुंडे! आता झुरळे थेट आमच्या घरांपर्यंत पोहोचत आहेत,” असे म्हणत त्यांनी या ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स आणि गोदामांच्या स्वच्छतेवर कडक पावले उचलण्याची विनंती केली. श्वेता यांचे स्टायलिस्ट व्हिक्टर रॉबिन्सन यांनीही हा व्हिडिओ शेअर करत या निष्काळजीपणाचा निषेध केला आहे.

‘रिअल सिंघम’ तुकाराम मुंडे यांची धाडसत्र मोहीम

महाराष्ट्रातील एफडीए आयुक्त आणि वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंडे हे सध्या राज्यात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत अत्यंत कडक धोरण राबवत आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि क्विक-कॉमर्सच्या गोदामांवर धाडी टाकून ते बेकायदेशीर गोष्टींवर कठोर कारवाई करत आहेत. त्यांच्या या धडक आणि धाडसी कामगिरीमुळे नागरिक सोशल मीडियावर त्यांना ‘रिअल सिंघम’ म्हणून संबोधत आहेत. श्वेता तिवारी यांच्या या तक्रारीनंतर आता एफडीए काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number