CRIME : पुण्याहून नाशिककडे निघाले; प्रवास संपताच बसस्थानकावर उतरले अन् वृद्ध दाम्पत्यासोबत घडला हादरवणारा प्रकार

पुणे ते नाशिक एसटी बसने वद्ध दाम्पत्याने प्रवास सुरु केला. सुरळीत आणि सुखकर हा प्रवास होईल, असंच त्यांना वाटलं होतं. मात्र, वाटेतच अशी धक्कादायक घटना घडली, ज्याची जराही कल्पना त्यांनी केली नव्हती. नेम

CRIME : पुण्याहून नाशिककडे निघाले; प्रवास संपताच बसस्थानकावर उतरले अन् वृद्ध दाम्पत्यासोबत घडला हादरवणारा प्रकार

पुणे :  पुणे ते नाशिक एसटी बसने वृद्ध दाम्पत्याने प्रवास सुरु केला. सुरळीत आणि सुखकर हा प्रवास होईल, असंच त्यांना वाटलं होतं. मात्र, वाटेतच अशी धक्कादायक घटना घडली, ज्याची जराही कल्पना त्यांनी केली नव्हती. नेमकं काय घडलं? आणि या घटनेनंतर पुढए काय झालं, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

प्रवास संपला अन् बसस्थानकावर समोर आलं सत्य
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध दाम्पत्य हे पुण्याहून नाशिककडे एसटी बसने प्रवास करत होते. याच प्रवासादरम्यान त्यांच्याकडे काही बॅग होत्या. त्यातील एका बॅगला त्यांनी सुरक्षिततेसाठी छोटं कुलूपही लावलं होतं. मात्र, पुणे ते नाशिक प्रवासाच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या बॅगचे कुलून तोडून बॅगमधील असलेले सोन्याचे दागिने लंपास केले.

हेही वाचा-Panvel Crime : दीर म्हणून जवळीक वाढवली, पतीसोबत मिळून रचला भयंकर कट; महिलेसोबत जे केलं ते धक्कादायक…; नवी मुंबईत

चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये चक्क सोन्याच्या पाटल्या, दोन तोळ्यांच्या बांगड्या, राणीहार आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांचं एकूण वजन हे तब्बल 14 तोळे असून त्यांची किंमत ही लाखो रुपयांच्या घरात असल्याची माहिती मिळत आहे. नाशिकरोड बसस्थानकात पोहोचल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याने आपली बॅग पाहिली, त्याचवेळी आपल्या बॅगचं कुलूप तुटलेलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी बॅग उघडून पाहिल्यानंतर त्यातील असलेले सर्व सोन्याचे दागिने गायब असल्याचं समोर आलं.

पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू
घडलेल्या प्रकारानंतर दाम्पत्याने तातडीने नाशिकरोड पोलिस ठाण्यात धाव घेत चोरीची तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास ही सुरु केला आहे.  बसमध्ये नेमक्या कोणत्या ठिकाणी चोरी झाली, तसेच या चोरीमागे कोणाता हात होता, या सर्वांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number