Pune Stray Dog : दबा धरून बसले…, बेसावध असताना धावत आले…, पायाचा कचकचून चावा घेतला…; भटक्या कुत्र्यांचा बाळासह महिलेवर हल्ला

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढतंच चालले आहे. आता एका चिमुरड्याला घेऊन बाहेर पडलेल्या आईवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आईच्या हातातून निसटून चिमुरडा थेट रस्त्यावर आदळला. सुदैवाने या एक वर्षीय मुलाच्या डोक्याला इजा झाली नाही. अन कुत्र्यानेही त्याला लक्ष केले नाही. पण आई अमृता बसन्नावार यात जखमी […]

Pune Stray Dog : दबा धरून बसले…, बेसावध असताना धावत आले…, पायाचा कचकचून चावा घेतला…; भटक्या कुत्र्यांचा बाळासह महिलेवर हल्ला

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढतंच चालले आहे. आता एका चिमुरड्याला घेऊन बाहेर पडलेल्या आईवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आईच्या हातातून निसटून चिमुरडा थेट रस्त्यावर आदळला. सुदैवाने या एक वर्षीय मुलाच्या डोक्याला इजा झाली नाही. अन कुत्र्यानेही त्याला लक्ष केले नाही. पण आई अमृता बसन्नावार यात जखमी झाल्या. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळेंच्या प्रभागात भटक्या कुत्र्यांनी हैदोस माजवला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात रोजच भटकी कुत्री नागरिकांना लक्ष करत आहेत. 

हेही वाचा : Latur: लातूर हादरलं! खासगी रुग्णालयात बेकायदेशीर सिझेरियन; शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, अमृता बसन्नावार आपल्या एक वर्षाच्या मुलाला घेऊन बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी अचानक भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर झडप घातली. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या अमृता यांच्या हातातून चिमुरडा निसटला आणि थेट रस्त्यावर पडला. मुलगा रस्त्यावर पडल्याने काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.  या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना लक्ष्य केल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number