जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
बुलडाण्यातहीत रस्त्यांवर खड्डे पाहायला मिळालेत. खड्ड्यात पाणी साचले असून सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. खड्ड्यातील पाण्यात बसून शिवसेनेनं आंघोळ आंदोलन केले.
अनेकवेळा निवदेन देऊनही कोणतीच उपाययोजना होत नसल्यामुळे शिवसेनेनं हे आंदोल केले.
दरम्यान आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेनं दिला आहे.
मुंबईच्या पालिकेत शिवसेनेची सत्ता असून मुंबईतही रस्त्यांची स्थिती जैसे थेच पाहायला मिळत आहे. तर, बुलडाण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शिवसेनाच आंदोलन
करताना पाहायला मिळत आहे.