Sharad Pawar Letter To CM Devendra Fadanvis : महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाने मोठी दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला असून, काही भागांत पिके ही करपण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच शेतीमालाला सुद्दा अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणीही वाढलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना यावर करावी, अशी मागणी केलेली आहे.
केल्या ‘या’ मागण्या
खरं तर शरद पवारांनी या पत्रातून राज्यातील शेतकरी तसेच शेतमजूर, पशुधन आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधून दिले आहे. सोयाबीन,कापूस, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांना दडी मारलेल्या पावसाचा मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. पावसाअभावी सर्व पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यताही त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांनी सरकारसमोर तब्बल 9 मुख्य मागण्या मांडल्या आहेत. गंभीर परिस्थिती असलेल्या अनेक तालुक्यांमध्ये औपचारिक निषकांची वाट न पाहता तातडीने दुष्काळ जाहीर करुन टाकावा आणि दुष्काळी सवलती सुद्धा लागू कराव्यात, अशी पहिली मागणी केली आहे.
शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपये, तर शेतमजूर असलेल्या कुटुंबांना 25 हजार रुपये इतकी मदत देण्याची मागणी केली आहे तसेच कर्जमाफी सुद्धा लागू करुन शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणीही पत्रात केली गेली आहे. नियमित कर्जफेड करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान हे 50 हजारांवरुन एक लाख रुपये करावे, असेही पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा-Hinjewadi : रोहित पवार हिंजवडीत गेले अन् जे दिसलं ते पाहून संतापले, ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?;VIDEO
दुष्काळसदृश भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा?
एवढेच नाही तर वीजपुरवठ्यातील असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी दुरुस्तीची विशेष मोहिम सुरु करावी, अशी मागणी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात पाऊस, पिके,पाणी,चारा, पशुधनाच्या प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरु करावे, अशी सूचना केल्या आहे. महत्त्वाचे म्हणजे दुष्काळसदृश भागातील विद्यार्थ्यांचे फक्त परीक्षा शुल्क नाही तर, संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी सुद्धा शरद पवारांनी केली आहे.