बिगबॉसच्या घरातून सर्वांच्या घरात पोहोचलेली बॉलीवूडची बबली अभिनेत्री शहनाज गिल तिच्या बिनधास्त स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या आगामी ‘किसी का भाई किसी कि जान’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त दिसत आहे. अशातच सोशल मीडियावर शहनाजचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती चक्क इंस्टाग्रामवर तिचं फेक अकाउंट चालवताना दिसत आहे.
बऱ्याच वेळा बॉलीवूडच्या लाईमलाईटपासून दूर अनेक बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींचे सोशल मीडियावर फेक अकाऊंट असतात.बऱ्याचदा ते स्वतः हे अकाउंट हॅन्डल करत असतात. असच नुकतंच अभिनेत्री शहनाज गिल तिचं फेक इन्स्टाग्राम अकाऊंट चालवताना दिसली. मंगळवारी रात्री सलमान खान ची भेट घेऊन घरी जाताना त्यावेळी पापाराझींनी तिचा व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये ती मोबाइलला चालवताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत ती सलमानसोबत काढलेला सेल्फी ती इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करताना दिसतेय. पण या व्हिडिओत नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं ते म्हणजे तिच्या फेक अकाउंटने . प्रत्यक्षात शहनाजच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास 14 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मात्र व्हिडिओत दिसणाऱ्या अकाऊंटवर तिच्या दहापेक्षाही कमी लोक तिला फॉलो करतात तर ती बऱ्याच लोकांना फॉलो करते. आता ह्या व्हिडिओला वेगवेगळ्या प्रकारच्या कंमेंट्स येत आहेत. काहींना हा व्हिडिओ मजेशीर वाटतोय तर काहींनी पापाराझींवरही टीका केली.