किंग खान @53

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा आज 53 वा वाढदिवस… शाहरूखने घरी कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला. शाहरूखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनीही रात्रीपासूनच मन्नत बंगल्याबाहेर गर्दी केली आहे. चाहत्यांची अलोट गर्दी पाहता शाहरूखने गॅलरीत येऊन आपल्या चाहत्यांना अभिवादन करत थॅंक्स म्हटलं आहे.   शाहरुख खानच्या एक झलकसाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांनी त्याला फोटोमध्ये टिपण्यास सुरूवात केली.  शाहरुखच्या झिरो या सिनेमाचा ट्रेलरही आज लाँच […]

किंग खान @53

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा आज 53 वा वाढदिवस…

शाहरूखने घरी कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला. शाहरूखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनीही रात्रीपासूनच मन्नत बंगल्याबाहेर गर्दी केली आहे. चाहत्यांची अलोट गर्दी पाहता शाहरूखने गॅलरीत येऊन आपल्या चाहत्यांना अभिवादन करत थॅंक्स म्हटलं आहे.

 

Shah-rukh-khan.jpg

शाहरुख खानच्या एक झलकसाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांनी त्याला फोटोमध्ये टिपण्यास सुरूवात केली.  शाहरुखच्या झिरो या सिनेमाचा ट्रेलरही आज लाँच होणार आहे.

रोमान्सचा बादशहा शाहरुख खान याने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकेतुन केली. त्यानंतर त्याने खलनायकाच्या भूमिकेतून सिनेसृष्टीत प्रवेश केला मात्र तो ‘दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे’ या चित्रपटातून एक रोमॅंटीक हिरो म्हणून जास्त प्रसिद्धीस आला आणि त्यानंतर त्याची इमेजच बदलून गेली. त्याने त्याच्या कामगिरीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अशा खास सुपरस्टारला सोशल मीडियावरही शुभेच्छा देण्यासाठी #HappyBirthdayShahRukhKhan #HappyBirthdaySRK #KingKhan Mannat हे हॅशटॅग वापरले जात आहेत. 

 

index1.jpg

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number