अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडा शहरातील संचारबंदीचा आज दुसरा दिवस आहे. अचलपूर शहरात रविवारी रात्री १० वाजेदरम्यान दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याच्या वादावरून दोन समुदायात तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर अमरावतीमधील अचलपूर, परतवाडा शहरात कलम १४४ लागू करण्यात आला असून पोलिसांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत.
दुसऱ्या दिवशीही अमरावतीमधील अचलपूर, परतवाडा शहरात संचारबंदी कायम आहे. दरम्यान, अत्यावश्यक कामासाठी अमरावतीच्या संचारबंदीत २ तासाची शिथिलता आणण्यात आली. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत अमरावतीत शिथिलता आणण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात काल रात्री १०च्या सुमारास दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याच्या वादावरून दोन समुदायात वाद निर्माण झाला. यावेळी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून दरम्यान, याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही शहरात परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या घटनेनंतर येथे पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून पोलिसांची अतिरिक्त तुकडीसुद्धा बोलवण्यात आली आहे.